Friday, 31 December 2021

सेट परीक्षा प्रश्नपत्रिका फ्लिप पुस्तक (Question Paper Flipbook)

 

सेट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (Flip Book) पुस्तकाच्या स्वरूपात अभ्यासाच्या सरावासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. खालील पुस्तकांच्या लिंक वर तुम्ही प्रश्नपत्रिका अभ्यासून ती सोडवू शकता तसेच शेवटी उत्तरसूची देण्यात आलेली आहे. चला तर अभ्यास करूया....                                 


1) सेट प्रश्नपत्रिका मे 2016 फ्लिप पुस्तक  (Flipbook Question Paper SET Exam May 2016)


2) सेट प्रश्नपत्रिका April-2017 फ्लिप पुस्तक (Flipbook Question Paper SET Exam April-2017)



SET Book 2 

 3)  सेट प्रश्नपत्रिका JAN-2018 फ्लिप पुस्तक (Flipbook Question Paper SET Exam JAN-2018)                SET Exam Jan-2018 Book

Saturday, 4 December 2021

JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021

 

JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021

युजीसी सीएसआयआर नेट परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सूरू अंतिम दिनांक 02, जानेवारी 2021


नॅशनल टेस्टिंग एजन्सी जून.2021  CSIR-UGC NET परीक्षा आयोजित करीत आहे. ज्युनियर रिसर्च फेलोशिप सहाय्यक प्राध्यापकाकरिता पात्रता (JOINT CSIR-UGC NET EXAMINATION JUNE-2021) परीक्षा असून परीक्षेचे अर्ज भरणे सुरू झाले आहेत. असे दि.03 डिसेबर,2021 रोजी पसिध्द करण्यात आलेल्या सूचनेमध्ये कळविले आहे. याबाबत तपशिल पुढील प्रमाणे आहे.

 संयुक्त CSIRUGC NET- जून-2021 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीचा ​​कालावधी: ऑनलाईन नोंदणी वा परीक्षेकरिता अर्ज करण्याचा कालावधी हा 03,डिसेबर 2021 ते 02,जानेवारी 2021 पर्यंत आहे.

सदर परीक्षा पुढील विषयामध्ये घेण्यात येणार आहे.  :

1. Chemical Sciences

2. Earth, Atmospheric, Ocean and Planetary Sciences

3. Life Sciences

4. Mathematical Sciences

5. Physical Sciences

संयुक्त परीक्षा CSIR-UGC NET जून-2021 मध्ये बसू इच्छिणारे  उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. https://csirnet.nta.nic.in, www.nta.ac.in वेबसाइट वर कोर्स कोड, पात्रता निकष, नमुना यांचे तपशील प्रश्नपत्रिका इत्यादी माहिती पत्रक उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी सीएसआर एनटीए या वेबसाईटला भेट दया.



Friday, 3 December 2021

Maharashtra TET Answer Key-2021

         महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द


महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा अंतरिम तात्पुरती उत्तरसूची प्रसिध्द (Maharashtra TET Answer Key-2021)

 

उत्तरसूची प्रसिध्द: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिश्देमार्फत रविवार दिनांक 21 नोव्हेबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पूरती उत्तरसूची प्रसिध्द टीईटी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

आक्षेप नोंदविण्याचा दिनांक 08.12.2021 हा प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास तो परिषदेकडे दि. पर्यंत नोंदविता येणार आहे. आक्षेप नोंदणी लिंक परीक्षार्थ्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अंतिम उत्तरसूची बाबत विहित मुदतीत ऑनलाईन रित्या प्राप्त झालेल्या आक्षेपाचा विचार करून  विषय तज्ञांच्या अभिप्रायानुसार अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे व्दारा कळविण्यात आलेले आहे.

             


             अधिक माहितीसाठी उमेदवाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईला भेट देत राहवे. 

               Post by : SKEduatoR 




Thursday, 18 November 2021

Ph.D. Entrance Test Syllabus

 पीएच. डी. प्रवेश परीक्षा

पेपर पहिला

Syllabus for All Subject 


1. संशोधन अभियोग्यता (I- Research Aptitude)
·     संशोधन:अर्थ,वैशिष्टये आणि प्रकार
·     संशोधनाच्या पाय-या
·     संशोधनाच्या पध्दती
·     संशोधन नितितत्त्वे
·     पेपर, लेख, कार्यशाळा, सेमिनार ,परिषद आणि परिसंवाद
·     अहवाल लेखन, वैशिष्टये आणि नमुना 

2. अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude)
·     अध्यापन: स्वरूप ,उद्दिष्टये, वैशिष्टये आणि आवश्यक बाबी
·     अध्ययनकर्त्यांची वैशिष्टये
·     अध्यापनावर परिणाम करणारे घटक
·     अध्यापनाच्या पध्दती
·     अध्यापनाची साधने
·     मूल्यमापन प्रणाली 

3. वाचन आकलन (Reading Comprehension)
·     उत्तारा वाचन करून प्रश्नांची उत्तरे देणे. 

4. मूलभूत विज्ञानाबद्दल सामान्य जागरूकता (General Awareness about Basic Science)
·      एसएससीच्या पातळीपर्यंत मूलभूत विज्ञान
5. गणितीय तार्किकता (Mathematical Reasoning)
·     अंकमालिका (Number series)
·     अक्षरमालिका (Letter series)
·     कोड (Codes)
·     परस्परसंबंध  (Relationships)
·     वर्गीकरण (Classification)
6. तार्किक कारणमिमांसा (Logical Reasoning)
·      वितर्कांची रचना समजून घेणे Understanding the structure of arguments
·     Evaluating and distinguishing deductive and inductive reasoning
·      शाब्दिक साधर्म्य: शब्द सादृश्य, उपयोजित सादृश्य Verbal analogies: Word analogy, Applied analogy
·      मौखिक वर्गीकरण Verbal Classification
·      तर्कसंगत तार्किक आकृत्या: साधे रेखाचित्र संबंध, मल्टीडायग्राम मॅटिक संबंध, वेन आकृती, विश्लेषणात्मक तर्क Reasoning Logical Diagrams: Simple diagrammatic relationship, multidiagram Matic relationship, Venn Diagram, Analytical Reasoning   
7. माहितीचे अर्थनिवर्चन (Data Interpretation)
·     माहितीचे स्त्रोत, माहितीचे संपादन आणि अर्थनिवर्चन
·     संख्यात्मक आणि गुणात्मक माहिती
·     आलेखाव्दारे सादरीकरण आणि डेटाचे मॅपिंग
8. माहिती आणि संप्रेषण तंत्रविज्ञान (Information and Communication Technology)
·     आयसीटी: अर्थ फायदे तोटे आणि उपयोग
·     सामान्य सक्षिप्त रुपे आणि संज्ञा (General Abbreviations and terminology)
·      इंटरनेट आणि ई -मेलिंगची मूलभूत माहिती
9. पर्यावरण जागृती (Environmental Awareness)
·     लोक व पर्यावरण यातील आंतरक्रिया
·     प्रदुषणाचे स्त्रोत
·     प्रदुषण आणि त्यांचे मानवीजीवनावरील परिणाम
·      नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधनांचे शोषण
·      नैसर्गिक धोके आणि शमन
10. उच्च शिक्षण प्रणालीविषयक सामान्य जागृती (General Awareness about Higher Education System)
·      भारतातील उच्च शिक्षण आणि संशोधनासाठी संस्थांची रचना
·      औपचारिक आणि दूरस्थ शिक्षण
·      व्यावसायिक , तांत्रिक आणि सामान्य शिक्षण
·      मूल्य शिक्षण
·      शासनव्यवस्था आणि प्रशासन
·      संकल्पना संस्था आणि त्यांच्यातील आंतरक्रिया
Note: Syllabus for KBC North Maharashtra Univesiry, Jalgaon)  

Posted by : SKEducatoR, 

****

Wednesday, 17 November 2021

लोक आणि पर्यावरण -SET MCQ Questions

 

लोक आणि पर्यावरण या घटकावरील परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न 

(Question Asked in SET Exam on 'People and Environment' 

1. पाण्यामध्ये असणे म्हणजे पाणी ई मुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. Presence of E-coli in Water is an indicator of --------contamination. (SET-Sept-2021)





ANSWER= (A)मलमूत्रा (Sewage)

 

2. नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीचे जास्तीत जास्त प्रमाण पुढीलप्रमाणे आहे. During day time, nose pollution in residential area should not exceed (SET-Sept-2021)





ANSWER= (B)55 dB

 

3. घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणा-या परिषदेला म्हणून ओळखले जाते.To regulate and control the transboundary movement of hazardous waste in also known as------------- (SET-Sept-2021)





ANSWER= (A)बेसल परिषद (Basel

 

4. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्या कायदे आहेत, त्यापैकी पुढील कायदा ‘बहुव्यापी एकछत्री कायदा’ म्हणून ओळखला जातो. There are number of Acts in India to prevent and controlof pollution. One of the following Act is known as ‘Comprehensive / Umbrella Act’? (SET-Sept-2021)





ANSWER= (C)पर्यावरण (संरक्षण) कायदा (Environment (Protection) Act

 

4. सामाजिक व आर्थिक विकासासाठी युनायटेड नेशन्सने शाश्वत विकासासाठीची किती ध्येये ठरविली आहेत. How many goals have been set for sustainable development by UN to achieve social and economical development. (SET-Sept-2021)





ANSWER= (B)17

Monday, 15 November 2021

युजीसी नेट परीक्षा हॉलतिकिट वेबसाईटवर उपलब्ध…

युजीसी नेट परीक्षा हॉलतिकिट वेबसाईटवर उपलब्ध आजच करा डाऊनलोड....
(UGC-NET Exam Hallticket-2021)

Sunday, 11 July 2021

पीएच.डी प्रवेश परीक्षा : 2021

 

पीएच. डी. प्रवेश  परिक्षा (पेट ) विषयी तुम्हाला माहित आहे का ?

PET – Ph.D. ENTRANCE TEST


पीएच. डी. प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते तीस पेट (PET) – Ph.D. Entrance Test असे म्हणतात.  पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येते व त्या व्दारे पीएच डी ला प्रवेश दिला जातो. प्रत्येक विदयापीठाची स्वतंत्रपणे पेट परीक्षेसंदर्भात जाहिरात वतर्मानपत्र तसेच त्या त्या विदयापीठाच्या वेबसाईटला प्रसिध्द होते त्यानूसार अर्ज मागविण्यात येतात व परीक्षेनुसार प्रवेश दिला जातो.

      युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन Subject  Specific (विषयाशी निगडित) विषयावर आधारित असतो.  पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत.    नेट - सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून सुट देण्यात येते असे असले तरीही त्यांना प्रवेशाचा अर्ज मात्र भरणे आवश्यक आहे.

पेट परीक्षे विषयक थोडक्यात : (About PET Exam ) 

PET पेट म्हणजे काय ?

पेट ही पीएच डी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश प्ररीक्षा आहे. PET = Ph.D. Entrance Test

पीएच डी प्रेवशाकरिता ही परीक्षा देणे अनिवार्य आहे का ?

होय तुम्हाला पीएच डी प्रवेश घ्यावयाचा असेल तर पेट परीक्षा देणे व ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परीक्षेत सुट कोणास मिळते ?

जे सेट (SET) वा नेट (NET) परीक्षा संबंधित विषयात पात्र असतील तर त्याना पेट परीक्षेतून सूट मिळते मात्र त्यांना सुट मिळण्यासाठी अर्ज मात्र करावा लागतो.

प्रत्येक विदयापीठाची पेट परीक्षा स्वंतत्र असते का ?

होय, प्रत्येक विदयापीठ पीएच डी प्रवेशासाठी स्वंतत्रपणे पेट परीक्षा घेते

पेट परीक्षेत किती पेपर असतात ?

युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट दोन पेपर असतात. (Two Papers)

1)      Research Methodology Paper

संशोधन पध्दती या विषयावर आधारित पेपर

2)      Subject  Specific (विषयाशी निगडित पेपर )

पीएच. डी. कशासाठी ?

युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट सोबतच पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे.

संशोधन पध्दती (Research Methodology) या विषयाकरिता कोणती पुस्तके आहेत.

पेपर एक हा संशोधन पध्दतीवर आधारित आहे त्यासाठी तुम्ही संशोधन पध्दती या विषयावर आधारित पुस्तके वाचू शकता तसेच इंटरनेटवरील मुक्त संसाधनाचा वापर करून संशोधनातील संकल्पना समजून घेउ शकता.

संशोधन पध्दती या पेपरचे स्वरूप कसे असते ?

पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. 

पेपर दोन करिता पुस्तके ?

पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा  पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील.

चुकीच्या उत्तरांना गुण वजावट पध्दत असते का

पेट परीक्षेत चुकीच्या उत्तरांना गुण वजावट पध्दत (निगेटिव्ह मार्किंग पद्धती) लागू नाही.


पीएच.डी करिता फेलोशिप

     पूर्ववेळ संशोधन कार्य करण्यासाठी पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते.

पेट परीक्षेची जाहिरात कधी प्रसिध्द होते ?

विदयापीठ निहाय प्रत्येक शैक्षणिक वर्षात रिक्तजागाकरिता जाहिरात प्रसिध्द केली जाते.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी प्रवेश परीक्षा :    





Sunday, 27 June 2021

संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)

 

संशोधन अभियोग्यता (Research Aptitude) या विषयाची तयारी कशी कराल
सेट नेट पेपर पहिला (NET-SET Paper-I )

                             

सेट वा नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर करिता एकुण दहा घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)  होय. मित्रांनो, मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, मी केवळ एक वा दोन गुण कमी पडल्यामूळे पास झालेलो  नाही, हे तुमच्या सोबत होऊ नये असे मला वाटते. म्हणूनच सदर ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रत्येक घटकाविषयी सविस्तर मार्गदर्शन मोफत स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळेल हा प्रयत्न सातत्याने करित आहे. सेट वा नेट परीक्षा पात्र होण्यासाठी सदर लेखाच्या माध्यमातून संशोधन अभियोग्यता या विषयाची तयारी तुम्ही कशी कराल ? या विषयी माझी मते तुम्हाला सांगणार आहे. माझा या क्षेत्रातील एक तपापेक्षा जास्त अनुभव आहे. मला असे जाणवले आहे की, अनेकदा विदयार्थी संशोधन या विषयावरील प्रश्नांची उत्तर अदाजे देतात. अनेकदा प्रश्न सोपा असतो पण अदाजे उत्तरे देण्याच्या प्रयत्नात आपण फसतो. तेव्हा खालील काही गोष्टी लक्षात असूदया व त्यानुसार तयारी करावी असे माझे प्रामाणिक मत आहे.

कशी कराल संशोधन विषयाची तयारी हे लक्षात घ्या…

1)      संशोधन विषयातील मुलभूत संकल्पना समजून घ्या.

तुम्ही सेट वा नेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही संशोधन विषयातील मुलभूत संकल्पना  समजून घेणे आवश्यक आहेत. हया संकल्पना मध्ये प्रामुख्याने संशोधन म्हणजे काय? संशोधन समस्या , संशोधन उद्दिष्टे, परिकल्पना, गृहीतके, जनसंख्या, नमुना अथवा न्यादर्श, संशोधन अभिकल्प , संख्याशास्त्रीय परिमाणे इत्यादी वा अनेक संकल्पनाचा समावेश होतो हया सर्व संकल्पना तुम्ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

2) प्रश्नपत्रिकेतील विचारलेले प्रश्न लक्षात घेणे :

संशोधन विषयाची तयारी करताना परीक्षेत पुर्वी संशोधन विषयावर कशाप्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत ? हे पहावे ते प्रश्न संशोधन विषयातील कोणत्या संकल्पनेवर आधारित आहेत हे लक्षात घ्यावे, ती संकल्पना बाजूला काढून त्यावर नोटस काढाव्यात व शिक्षक किंवा तुमच्या मित्राशी चर्चा करून ती संकल्पना नेमकी काय आहे ? हे ध्यानात घ्यायला हवे. याला मी ‘प्रश्नाकडून संकल्पनेकडे’ येणे असे संबोधतो.

3)      एक पेज नोटस काढा :

संशोधनातील एका संकल्पनेवर केवळ एक पेज नोटस काढाव्यात. एकादा ती संकल्पना समजली की एक पेज नोटस पुरेश्या आहेत, असे माझे ठाम मत आहे. समजा तुम्हाला ‘परिकल्पना’ या संशोधनाच्या संकल्पनेवर नोटस काढावयाच्या आहेत तेव्हा त्यामध्ये परिकल्पनेचा अर्थ प्रकार व उदाहरण ऐवढे पुरेशे आहे. या साठी तुम्ही प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परिकल्पनेवर त्याचा अर्थ प्रकार व उदाहरण यावरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

4)   संशोधन विषयासाठी कोणती पुस्तके वाचाल :

अनेक विदयार्थी प्रश्न विचारतात की, पेपर एक करिता कोणते पुस्तक वाचावे ? परंतु मी विद्यार्थ्यांना सर्व पेपर एक करिता एक पुस्तक न वाचता घटक निहाय वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा सल्ला नेहमीच देतो. शैक्षणिक संशोधन या विषयाकरता पुढील पुस्तके वाचावित अशी शिफारस मी करित आहे.

ü मुळे रा. श आणि उमाठे वि. तु., शैक्षणिक  संशोधनाची मुलतत्त्वे, महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळ, नागपूर

ü पंडित ब. बि. , शिक्षणातील संशोधन,नित्यनूतन प्रकाशन, पुणे

ü भिंताडे, वि.रा. , शैक्षणिक  संशोधन पद्धती, नूतन प्रकाशन, पुणे.

ü प्रदिप आगलावे, संशोधन पध्दती आणि तंत्रे, विदयाप्रकाशन नागपूर

ü दांडेकर वा. ना. शैक्षणिक मूल्यामापन व संख्याशास्त्र, विदयाप्रकाशन नागपूर

ü य.च.म.मु. विदयापीठ, नाशिक ,संशोधन मार्गदर्शक मालिका    पुष्प 1 ते 15 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ ,नाशिक

ü Best John W & Kahn J. V. , Research In Education, New Delhi, Prentice Hall of India Pvt. Ltd.

म्हणजे मी तुम्हाला एम. एड. स्तरावरील शैक्षणिक संशोधन या विषयावरील संशोधनाच्या पुस्तकाची शिफारस करित आहे. ही पुस्तके तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रकाशकाकडे व पुस्तकाच्या दुकानात मिळतील अथवा जर कोणी एम. एड .करित असेल तर त्याच्या कडे पण असतील. जर तुम्हाला वरील पुस्तके मिळाली नाहीत तरही काही हरकत नाही तुमच्या कडे संशोधनाचे जे पुस्तक असेल वा जे पुस्तक तुम्ही मिळवू शकाल त्या पुस्तकातून तुम्ही संकल्पना समजून घ्याव्यात महत्त्वाचे काय ? तर संकल्पना समजून घेणे.

5)   पुस्तकाशिवाय हा विषय हा विषय कसा समजून घ्याल ?

जर तुमच्या कडे पुस्तके नसतील तर तुम्ही ती मिळविण्याचा प्रयत्न करा व जर मिळालीच नाही तर तुम्ही संशोधन हा विषय कसा समजून घ्याल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर अगदी सोपे आहे.

 ü गुगल वर शैक्षणिक संशोधन विषयावर लाखोपेजस माहिती आहे त्यावर शोध घ्या.

 ü युटयूब वर संशोधन विषयावर व्हिडीओ पहा व संकल्पना समजून घ्या.

 ü संशोधन पध्दती या विषयावरील कार्यशाळा वा परिषदामध्ये सहभागी व्हा व संकल्पना समजून घ्या.

 ü तुमच्या एम.एड. वा पीएच. डी. झालेल्या मित्रांकडून संशोधन विषयातील संकल्पना माहिती करून घ्या.

 ü संशोधन पध्दती विषयावरील लेखांचे इंटरनेटवर वाचन करा.

मित्रांनो ‘इच्छा तिथे मार्ग’ हे आपणास माहित आहेच. महत्वाचे काय तर संशोधन विषयावरील संकल्पना समजून घेणे. त्या कशा समजून घेणार आहात ते तुम्ही ठरवा. सदर ब्लॉगवर पण तुम्हाला सर्व घटकाच्या महत्त्वपूर्ण नोटस मिळणार आहेतच. चला तर परीक्षेची तयारी  करूया !

  © सर्व हक्क सुरक्षित by SKEucator 


Saturday, 26 June 2021

संप्रेषण प्रश्नसंच

 


संप्रेषण  या घटकावर नेट सेट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरासह

                                                                                                    Photo by Aaron Burden on Unsplash

1)    संप्रेषणचक्रांचे प्रेषक, संदेश, ग्राहक व --------------हे घटक आहेत. (SET-जून 2020)

(A)            गोंधळ

(B)             माध्यम

(C)             अडथडे

(D)            प्रत्याभरण

2)    पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते ? (SET-जून 2020)

                    (A)            व्यक्तिगत संप्रेषण

(B)             औपचारिक संप्रेषण

(C)             क्षैतिज (Horizontal) संप्रेषण

(D)            अनौपचारिक संप्रेषण

3)    संप्रेषणाची व्याख्याकरताना मिलर --------------भर देतात. (SET-जून 2020)

(A)            ग्राहकाच्या वर्तनबदलावर

(B)             संदेशावर

(C)             अवबोधावर

(D)            प्रेषकावर

4)    संप्रेषणचक्रामध्ये प्रेषकांची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात : (SET-जून 2020)

(A)            संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण- प्रक्षेपण

(B)             ग्रहण -निसांकेतिकीकरण- अन्वय- प्रेक्षपण

(C)             ग्रहण-सुसूत्रीकरण – नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण

(D)            सांकेतिकीकरण-सुसूत्रीकरण– नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण

5)    बहुसंख्य श्रोते, बहुजिनसी श्रोते (heterogeneous audiences), विस्तारित श्रोते व ---------------ही समुह माध्यमाची वैशिष्टये होत. (SET-जून 2020)

(A)            निरीक्षर श्रोते

(B)             गोंधळाचा अडथळा

(C)             प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव

(D)            प्रभावी माध्यम

6)    डॉ. देवल, यांच्या मते संप्रेषण म्हणजे----- (SET-जून 2019)

(A)            कल्पनांचे सामायिकीकरण

(B)             अनुभवांचे सामायिकीकरण

(C)             अवबोधन

(D)            भावनाचे सामायिकीकरण

7)    वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उदिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या  माध्यमाविषयीचे ज्ञान व ------------------लक्षात घेतले पाहिजे. (SET-जून 2019)

(A)            अध्यापन पध्दती

(B)             शैक्षणिक साधने

(C)             समूह माध्यम

(D)            मूल्यमापन व्यवस्था

8)    टॅफिक सिग्नलस हे संप्रेषणचे उदाहरण होय. (SET-जून 2019)

(A)            समूह

(B)             अशाब्दिक

(C)             शाब्दिक

(D)            एकाकडून अनेक

9)    एखादया मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात ते आपल्या सामाईक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती  स्थिरपणे वृध्दिगंत

होत जातात हे--------- समूहाचे उदाहरण होय.   (SET-जून 2019)

(A)            मुक्त

(B)             बध्द

(C)             सहकारी

(D)            श्रेणीबध्द

10)  काहीवेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे-------- ग्राहक असतात. (SET-जून 2019)

(A)            बहुजिनसी (heterogenous)

(B)             असंख्य

(C)             निरीक्षर

(D)            चिकित्सक


उत्तरसूची :

(B)             माध्यम

(C)             क्षैतिज (Horizontal) संप्रेषण

(A)            ग्राहकाच्या वर्तनबदलावर

(A)            संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण- प्रक्षेपण

(B)             प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव

(C)             अवबोधन

(D)            मूल्यमापन व्यवस्था

(B)             अशाब्दिक

(A)            मुक्त

(A)            बहुजिनसी (heterogenous)