खालील टिप्सचे सेट नेट साठी अनुकरण करा यश मिळेलच :
नेट
व सेट परीक्षे बाबत विद़याथ्र्यांच्या मनात अनेकदा भिती असलेली दिसून येते. परंतु ज्या विद़याथ्र्यां ने पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. त्यांना परीक्षेची भिती का असावी ? हा प्रश्न आपणास पडतो. अनेकदा ही परीक्षा खुपच कठीन आहे समज झाल्याचे दिसते परंतु आपण परीक्षेची भिती न बाळगता सकारात्मकतेने परीक्षेला सामोरे गेलात तर तुम्हाला नक्की यश मिळेल यात शका नाही. याठीकाणी काही महत्त्वाच्या बाबी दिल्या
आहेत त्याचे अनुकरण करून परीक्षेला सामोरे जा नक्कीच यश मिळेल.
खालील टिप्सचे सेट नेट साठी अनुकरण करा यश मिळेलच :
1. अभ्यासक्रमाचा अभ्यास
करा:- अभ्यासक्रम हा यशाकडे घेऊन जाणारा
असतो अनेकदा विद़यार्थी अभ्यास करतांना दिसतात मात्र नेमक्या पध्दतीने अभ्यास करत
नाहीत पर्यायाने अपयशी होतात. तेव्हा लक्षात ठेवा की
अभ्यासक्रम आपल्याला यशाकडे घेवून जातो पूर्वतयारीचा एक भाग म्हणजे अभ्यासक्रम
व्यवस्थितीत समजावून घेणे हा होय. अभ्यासक्रम सतत जवळ बाळगा अभ्यासक्रमानुसारच
अभ्यास करावा.
2. अभ्यासक्रमाचे विश्लेषण
करा:- अभ्यासक्रम नीट समाजाऊन घेण्यासाठी अभ्यासक्रमाचे विश्लेषण कराव. त्यामूळे अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या बाबी आपल्या सहज लक्षात
येतात.अभ्यासक्रमातील आशय मुद्दे लक्षात घ्यावेत.
3. पूर्वीच्या
प्रश्नपत्रिकाचा अभ्यास:- पूर्वीच्या प्रश्नपत्रिका आपल्या अभ्यासास दिशा देण्याचे
कार्य करतात. त्यासाठी अभ्यासक्रमाबरोबरच पूर्वीच्या
जून्याप्रश्नपत्रिकाचा संग्रह आपल्या जवळ करावा त्याच्या अभ्यास
केल्यास आपल्याला प्रश्नाचे स्वरूप समजण्यास मौलाची मदत होते. अभ्यास केल्यानंतर
तुम्ही कोणत्या मुदयावर कशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आला आहे. यासाठी मागील काही परीक्षेचा प्रश्नपत्रिकाचा अभ्यास करा.
4. प्रश्नपत्रिकेवरून मूळ
संकल्पनेकडे या : प्रश्नाकडून अभ्यासक्रमाकडे
हे सूत्र चा अवलंब करा. प्रश्नपत्रिकेचे विश्लेषनावरून तुम्हाला
हे ध्यानात येते, की कोणता प्रश्न कोणत्या घटकावर आणि उपघटकावर विचारला गेला आहे, हे लक्षात आल्यावर त्यातून तुम्ही ज्या संकल्पनेवर प्रश्न विचारला
आहे ती संकल्पना समजून घेवू शकता.
5. अभ्यासक्रमातील
मूख्यसंकल्पना समजून घ्या : परीक्षा
पात्र होण्यासाठी मूळ संकल्पना आपणास सजमने गरजेचे
आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यासक्रमातील मूळ
संकल्पना वेगळया करून त्याचा नोट्स तयार करून घ्या.
6. संकल्पनानुसार मुद्देसुद्द नोट काढणे: एकदा मूळ संकल्पना समजली की
ती कागदावर लिहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वतंत्र कागदावर नोट्स काढा, तसे केल्यामूळे आपल्याला त्या
नोट्स नंतर क्रमांने लावता येतील.
7. अभ्यासक्रम नेहमी जवळ असू
दया : मित्रहो, अनेक विद़यार्थी असे म्हणतात की, मी तर खुप अभ्यास केला होता पण पात्र झालो नाही. याचाच अर्थ त्यांनी केलाला अभ्यास हा अभ्यासक्रमास अनुसरून केला नसावा. म्हणूनच नेहमी अभ्यासक्रम जवळ ठेऊनच पुढे जा.
8. एकाच पुस्तकावर
विसंबून राहू नका: अनेक विद़यार्थी बाजारातून एक पुस्तक आणून
त्यातील प्रश्न-उत्तरे वाचून अभ्यास करतात, परंतू मूळ संकल्पना स्पष्ट झाल्यानंतरच
परीक्षेत अचूक उत्तरे सोडविता येतात हे लक्षात घ्या.
9. अभ्यासात चर्चा पध्दती
वापरा : अनेकदा काही मुददे आपल्याला समजत नाहीत. अशावेळी
तूम्ही तुमचे मित्र आणि शिक्षक यांच्याशी चर्चा करा म्हणजेच ती संकल्पना समजन्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment