Photo by Alfons Morales on Unsplash
सर...
मी सेट पास झालो असतो ,पण एक -दोन मार्कच कमी पडला?
पेपर सोपा होता पण माहिती नाही गुण कसे कमी
पडले?
सर पेपर पहिल्याकरिता कोणते पुस्तक वाचू?
हे व असे अनेक प्रश्न सेट नेट तयारी करणारे
विदयार्थी मला विचारतात. अलीकडच्या काळात नेट सेट परीक्षा देणाऱ्या
विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसते. नेट जे.आर.एफ. (NET JRF) करून
पीएच.डी संशोधनासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध होत आहे. तसेच सहायक प्राध्यापक
होण्यासाठी सेट नेट परीक्षा पात्र होणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन पर्टननूसार या
परीक्षेत एकुण दोन पेपर आहेत. पेपर एक हा सर्व विषयासाठी समान असून तो शंभर गुणाचा
असतो. कोणत्याही विषयात सेट नेट परीक्षा देणा-या विदयाथ्र्यांना हा पेपर अनिवार्य
आहे.नेट सेट परीक्षेला पेपर एकचा अभ्यासक्रम विविधांगी १० घटकात विभागला गेल्याने
यासाठी नेमके काय वाचायचे हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो. सदर पेपर मध्ये एकुण
दहा घटक आहेत. त्यानुसार प्रत्येक घटकावर पाच प्रश्न विचारले जातात.पहिल्या पेपर
मध्ये चांगले गुण प्राप्त केल्यास सेट नेट पात्र होण्याची शक्यता अधिक असते प्रत्येक
घटकाची तयारी करणे आवश्यक आहे ते घटक म्हणजे
घटक क्र. 1 अध्यापन अभियोग्यता (Teaching
Aptitude)
घटक क्र. 2. संशोधन अभियोग्यता (Research
Aptitude)
घटक क्र.3. वाचन आकलन (Reading
Comprehension)
घटक क्र.4. संप्रेषण (Communication)
घटक क्र. 5. गणितीय तार्किकता आणि
अभियोग्यता (Reasoning Including Mathematical )
घटक क्र. 6. तार्किक युक्तीवाद (Logical
Reasoning)
घटक क्र. 7. माहितीचे अर्थनिर्वचन (Data
Interpretation)
घटक क्र. 8. माहिती आणि संप्रेषण
तंत्रविज्ञान (Information and Communication Technology (ICT)
घटक क्र. 9. व्यक्ति आणि पर्यावरण (People
and Environment)
घटक क्र. 10. उच्च शिक्षण प्रणाली (Higher Education System)
कोणते पुस्तक वाचाल ?
नेट-सेट पेपर एकच्या २०१९ च्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रकाशित झालेले डॉ.शशिकांत अन्नदाते यांचे के'सागर पब्लिकेशन्स, पुणे व्दारा प्रकाशित " नेट सेट पेपर पहिला ‘अध्यापन व संशोधन अभियोग्यता - संपूर्ण मार्गदर्शक" हे पुस्तक पेपर एक करिता अत्यंत उपयुक्त असेच आहे. सेट नेट परीक्षेची तयारी करणाया सर्व विषयाच्या विदयाथ्र्यांना मी या पुस्तकांची शिफारस करतो कारण..... हेच पुस्तक का?
1) नेट सेट पेपर एकच्या दहाही घटकांचा सखोल
परामर्श पुस्तकात घेण्यात आला आहे.
2) पुस्तकात अभ्यासक्रमातील सर्व मुद्दे व
उपमुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत.
3) लेखक डॉ.अन्नदाते हे स्वत अनेक विषयात
सेट-नेट परीक्षा उर्तीण आहेत.
4) पुस्तकाची भाषा साधी सोपी असून
संकल्पनात्मक महितीबरोबरच महत्वपूर्ण मुद्यांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे.
5) सकल्पनांच्या विश्लेषणाकरिता तक्ते,
आकृती व आलेख यांचा उपयोग करण्यात आला आहे.
6) वरील प्रत्येकघटकावर सविस्तर
संल्पनास्पष्ट करून स्पष्ट करून नेट सेट परिक्षेत विचारलेले प्रश्न व सराव प्रश्न
यांचा समावेश करण्यात आला आहे.
7) पुस्तकात जवळजवळ 3000 प्रश्न असून प्रश्नांची काठिण्यपातळी नेट सेट परीक्षेतील प्रश्नांच्या
दर्जाशी सुसंगत असल्याचे दिसते.
8) जुन्या सेट परीक्षेच्या काही
प्रश्नपत्रिकाही पुस्तकात दिलेल्या आहेत.
एकूणच सदरच्या दर्जेदार संदर्भ ग्रंथाच्या
माध्यमातून विद्यार्थी मित्रांना नेट, सेट व पेट परीक्षेत निश्चितच
यश मिळण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच सदर पुस्तकाची शिफारस करण्यात येत आहे. सदर
पुस्तक हे ऑनलाईन विकत घेता येते आपल्या सोयीकरिता येथे लिंक
देण्यात आली आहे. त्यावरून तुम्ही हे पुस्तक विकत घेउ शकता....
चला तर मग यश तुमच्या पासून दुर नाही.
सदर लेख तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करु
शकता तसेच काही प्रश्न असतील Comment मध्ये विचारू शकता.
Book Review By @ SKEducator...Total Rating 5 Star
No comments:
Post a Comment