पीएच. डी. प्रवेश परिक्षा (पेट ) विषयी तुम्हाला माहित आहे का ?
PET – Ph.D. ENTRANCE TEST
पीएच. डी. प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते तीस पेट (PET) – Ph.D. Entrance Test असे म्हणतात. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येते व त्या व्दारे पीएच डी ला प्रवेश दिला जातो. प्रत्येक विदयापीठाची स्वतंत्रपणे पेट परीक्षेसंदर्भात जाहिरात वतर्मानपत्र तसेच त्या त्या विदयापीठाच्या वेबसाईटला प्रसिध्द होते त्यानूसार अर्ज मागविण्यात येतात व परीक्षेनुसार प्रवेश दिला जातो.
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन Subject Specific (विषयाशी निगडित) विषयावर आधारित असतो. पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले जाणार आहेत. नेट - सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून सुट देण्यात येते असे असले तरीही त्यांना प्रवेशाचा अर्ज मात्र भरणे आवश्यक आहे.
पेट परीक्षे विषयक थोडक्यात : (About PET Exam )
PET पेट म्हणजे काय ? | पेट ही पीएच डी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश प्ररीक्षा आहे. PET = Ph.D. Entrance Test |
पीएच डी प्रेवशाकरिता ही परीक्षा देणे अनिवार्य आहे का ? | होय तुम्हाला पीएच डी प्रवेश घ्यावयाचा असेल तर पेट परीक्षा देणे व ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. |
परीक्षेत सुट कोणास मिळते ? | जे सेट (SET) वा नेट (NET) परीक्षा संबंधित विषयात पात्र असतील तर त्याना पेट परीक्षेतून सूट मिळते मात्र त्यांना सुट मिळण्यासाठी अर्ज मात्र करावा लागतो. |
प्रत्येक विदयापीठाची पेट परीक्षा स्वंतत्र असते का ? | होय, प्रत्येक विदयापीठ पीएच डी प्रवेशासाठी स्वंतत्रपणे पेट परीक्षा घेते |
पेट परीक्षेत किती पेपर असतात ? | युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट दोन पेपर असतात. (Two Papers) 1) Research Methodology Paper संशोधन पध्दती या विषयावर आधारित पेपर 2) Subject Specific (विषयाशी निगडित पेपर ) |
पीएच. डी. कशासाठी ? | युजीसीच्या धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट सोबतच पीएच.डी अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे. |
संशोधन पध्दती (Research Methodology) या विषयाकरिता कोणती पुस्तके आहेत. | पेपर एक हा संशोधन पध्दतीवर आधारित आहे त्यासाठी तुम्ही संशोधन पध्दती या विषयावर आधारित पुस्तके वाचू शकता तसेच इंटरनेटवरील मुक्त संसाधनाचा वापर करून संशोधनातील संकल्पना समजून घेउ शकता. |
संशोधन पध्दती या पेपरचे स्वरूप कसे असते ? | पहिला पेपर सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना, चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा सराव करणे आवश्यक आहे. |
पेपर दोन करिता पुस्तके ? | पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील. |
चुकीच्या उत्तरांना गुण वजावट पध्दत असते का | पेट परीक्षेत चुकीच्या उत्तरांना गुण वजावट पध्दत (निगेटिव्ह मार्किंग पद्धती) लागू नाही. |
पीएच.डी करिता फेलोशिप | पूर्ववेळ संशोधन कार्य करण्यासाठी पीएच.डी पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. |
पेट परीक्षेची जाहिरात कधी प्रसिध्द होते ? | विदयापीठ निहाय प्रत्येक शैक्षणिक वर्षात रिक्तजागाकरिता जाहिरात प्रसिध्द केली जाते. |
जर तुम्हाला पेट परीक्षा विषयक अधिक माहिती हवी असल्यास Comment box मध्ये निसंकोचपणे प्रश्न विचारा.
Post by SKEducatoR (All Right Reserved)
He exam form kade chlu hitata bharyala
ReplyDeleteनितिन....प्रत्येक विद्यापीठाची परीक्षेची तारीख वेगवेगळ्या असते.तशी जाहिरात पेपर मध्ये येत.
Delete