पीएच. डी. प्रवेश परिक्षा (पेट ) विषयी
तुम्हाला माहित आहे का ?
PET – Ph.D. ENTRANCE TEST
पीएच. डी. प्रवेशासाठी जी परीक्षा घेतली जाते तीस पेट (PET) – Ph.D. Entrance Test असे म्हणतात. पीएच.डी प्रवेशासाठी विविध विषयांसाठीच्या रिक्त
जागांसाठी पेट परीक्षा घेण्यात येते व त्या व्दारे पीएच डी ला प्रवेश दिला जातो. प्रत्येक
विदयापीठाची स्वतंत्रपणे पेट परीक्षेसंदर्भात जाहिरात वतर्मानपत्र तसेच त्या त्या विदयापीठाच्या
वेबसाईटला प्रसिध्द होते त्यानूसार अर्ज मागविण्यात येतात व परीक्षेनुसार प्रवेश दिला
जातो.
युजीसीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पेट परीक्षेत
दोन पेपर आहेत. यामधील पेपर एक Research Methodology (संशोधन पद्धती) व पेपर दोन
Subject Specific (विषयाशी निगडित)
विषयावर
आधारित असतो. पेट पेपर एक 50 प्रश्न संशोधन
पद्धतीवर आधारित आहेत, तसेच पेपर दोनमध्ये पदव्युत्तर विषयाशी निगडित 50 प्रश्न विचारले
जाणार आहेत. नेट - सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना
प्रवेश परीक्षेतून सुट देण्यात येते असे असले तरीही त्यांना प्रवेशाचा अर्ज मात्र भरणे
आवश्यक आहे.
पेट परीक्षे विषयक थोडक्यात : (About PET Exam )
PET पेट म्हणजे
काय ? |
पेट ही पीएच
डी प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश प्ररीक्षा आहे. PET = Ph.D. Entrance Test |
पीएच डी प्रेवशाकरिता
ही परीक्षा देणे अनिवार्य आहे का ? |
होय तुम्हाला
पीएच डी प्रवेश घ्यावयाचा असेल तर पेट परीक्षा देणे व ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
|
परीक्षेत
सुट कोणास मिळते ? |
जे सेट
(SET) वा नेट (NET) परीक्षा संबंधित विषयात पात्र असतील तर त्याना पेट परीक्षेतून
सूट मिळते मात्र त्यांना सुट मिळण्यासाठी अर्ज मात्र करावा लागतो. |
प्रत्येक
विदयापीठाची पेट परीक्षा स्वंतत्र असते का ? |
होय, प्रत्येक
विदयापीठ पीएच डी प्रवेशासाठी स्वंतत्रपणे पेट परीक्षा घेते |
पेट परीक्षेत
किती पेपर असतात ? |
युजीसीच्या
मार्गदर्शक तत्वानुसार पेट दोन पेपर असतात. (Two Papers) 1)
Research Methodology Paper संशोधन पध्दती या विषयावर आधारित पेपर 2)
Subject Specific (विषयाशी
निगडित पेपर ) |
पीएच. डी.
कशासाठी ? |
युजीसीच्या
धोरणानुसार 2021 पासून विद्यापीठात सहायक प्राध्यापक होण्यासाठी सेट नेट सोबतच पीएच.डी
अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच नोकरीत असणाऱ्या प्राध्यापकांना सहयोगी प्राध्यापक
होण्यासाठी पीएच.डी आवश्यक असणार आहे. |
संशोधन पध्दती
(Research Methodology) या विषयाकरिता कोणती पुस्तके आहेत. |
पेपर एक हा
संशोधन पध्दतीवर आधारित आहे त्यासाठी तुम्ही संशोधन पध्दती या विषयावर आधारित पुस्तके
वाचू शकता तसेच इंटरनेटवरील मुक्त संसाधनाचा वापर करून संशोधनातील संकल्पना समजून
घेउ शकता. |
संशोधन पध्दती
या पेपरचे स्वरूप कसे असते ? |
पहिला पेपर
सर्व विषयांसाठी अनिवार्य असून तो संशोधन पद्धती (Research Methodology) म्हणून ओळखला
जातो.या पेपरच्या अभ्यासक्रमात साधारणपणे संशोधन समस्या, संशोधन अहवाल,परिकल्पना,
चले, संशोधन पद्धती, संशोधन प्रकार, गुणात्मक व संख्यात्मक संशोधन, संशोधनासाठी संख्याशास्त्राचा
उपयोग, संशोधनासाठी संगणकाची उपयुक्तता इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात.संशोधन
पद्धती पेपरची व्याप्ती व अभ्यासक्रम समजून घेऊन त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडविण्याचा
सराव करणे आवश्यक आहे. |
पेपर दोन
करिता पुस्तके ? |
पीएच.डी प्रवेश परीक्षेतील पेपर दोन हा पदव्युत्तर पदवी विषयाशी संबंधित असतो.या पेपरच्या तयारीसाठी नेट सेट अभ्यासक्रमाची पेपर दोनची पुस्तके तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे संदर्भ ग्रंथ अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील. |
चुकीच्या
उत्तरांना गुण वजावट पध्दत असते का |
पेट परीक्षेत
चुकीच्या उत्तरांना गुण वजावट पध्दत (निगेटिव्ह मार्किंग पद्धती) लागू नाही. |
पीएच.डी करिता
फेलोशिप |
पूर्ववेळ संशोधन कार्य करण्यासाठी पीएच.डी
पदवीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलोशिप(JRF), जे.आर.डी. टाटा फेलोशिप, राजीव गांधी फेलोशिप
मिळते तसेच बार्टी व सारथी संस्थेकडूनही पीएच.डी साठी विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते. |
पेट परीक्षेची
जाहिरात कधी प्रसिध्द होते ? |
विदयापीठ
निहाय प्रत्येक शैक्षणिक वर्षात रिक्तजागाकरिता जाहिरात प्रसिध्द केली जाते. |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची
पीएच.डी प्रवेश परीक्षा :