अनुभवाचे बोल आणि मी
सेट पात्र झालो....
प्रा. समाधान लोटन कुंभार
अनेकांनी प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी
बाळगलेले असते. ज्यांच ध्येय हे १२ वी नंतर निश्चित झालेले असते, ते प्राध्यापक होण्यासाठीचे
मार्ग शोधून ठेवतात व त्या अनुषंगाने मार्गक्रमण करीत असतात. बर्याचवेळा काही
जणांच्या बाबतीत ऐनवेळेस प्राध्यापक होण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यासाठीच्या
पात्रतांचा शोध घेता-घेता बराच वेळ त्यात खर्च होतो. त्यात भरीस-भर नेट/सेट
परीक्षेविषयी अपूर्ण ग्यान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामूळे ही परीक्षा अधिकच
कठीण आणि असाध्य वाटायला लागते. हळू-प्राध्यापक पेशातील रस व प्रेरणा कमी व्हायला
लागते. परंतू जो ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढतो व यश संपादन करतो तोच खरा
शिक्षक, कारण अध्यापन कार्य हे देखील अवघड कडून सोप्याकडे या
पध्दतीनेच करावे लागते.
माझ्या बाबतीतही काहीशा प्रमाणात वरील कथन
केल्याप्रमाणेच झाले होते. मी बी.ए. पास झालो तोपर्यंत माझे ध्येय निश्चित नव्हते, आणि शिक्षकी/ प्राध्यापक
व्यवसायाचा लवलेशही नव्हता. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर काय करावे? हा प्रश्न उभा राहिला. त्याच काळात बी.एड. साठीची प्रवेश पात्रता चाचणीची
जाहिरात वर्तमान पत्रात वाचली आणि फाॅर्म भरला व पासही झालो. चांगल्या बी.एड. काॅलेजला
प्रवेशही झाला आणि त्यानंतर मात्र माझ्या मनात प्रकाश पडला तो शिक्षकी व्यवसायाचा.
मी पूर्णपणे या क्षेत्रासाठी मनाची तयारी केली आणि प्रामाणिकपणे अभ्यासही केला.
बी.एड. चांगल्या मार्कांनी पासही झालो. पुढील शिक्षणासाठी म्हणजेच एम.एड साठी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील, शिक्षणशास्त्र विभागात
प्रवेश घेतला. आतापर्यंत नेट/सेट परीक्षेविषयी फक्त वरवर ऐकले होते. मात्र एम.एड.
चे शिक्षण घेत असतांना आम्हाला तेथील प्रा. इंदुमती भारंबे, डाॅ. मनिषा इंदाणी व डाॅ. संतोष खिराडे यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. त्याच वर्षात या परीक्षेचे
स्वरुप कळाले. खरचं एखाद्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरची परीक्षा पास करायची
असेल तर योग्य मार्गदर्शनाची व अचूक कृतीची जोड असावी लागते. आणि ते मला या ठिकाणी
मिळाले होते. मी समाजशास्त्र विषयात तिसर्या प्रयत्नात तर शिक्षणशास्त्र विषयात
चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालो.
मला या परीक्षे संदर्भात आलेला वैयक्तिक अनुभव…
१) सदर परीक्षा ही प्राध्यापक होण्यासाठीची
पात्रता चाचणी असल्यामूळे तिची काठीण्य पातळी त्याच बरोबरीची असते, आपण त्याचा म्हणजेच काठीण्य
पातळीचा उगाच बाहू करतो आणि मनात भीतीचे वातावरण तयार करतो. असे करणे टाळावे.
३) सदर परीक्षेचा अभ्यास करतांना बाजारात
आलेल्या संक्षिप्त पुस्तकांचा आपण अभ्यास करतो, परंतू असे न करता जास्तीत-जास्त संदर्भ पुस्तकांचे
वाचन करावे तद्नंतर संक्षिप्त पुस्तकांचा अभ्यास करणे उचित.
३) दुसर्याने त्याच्या अभ्यासावरुन काढलेल्या
नोट्सचा आपण अभ्यास करतो. त्याने त्याच्या आकलन क्षमतेनुसार व बुध्दिमत्तेनुसार
त्या नोट्स काढलेल्या असतात त्या दुसर्यास किती उपयुक्त ठरतील ही शंका. म्हणून
स्वतः नोट्स तयार करा.
४) अभ्यास करण्याचा आव नका आणू. अभ्यासाचे
नियोजन करा. व अभ्यासाशी प्रामाणिक रहा.
५) सध्या परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेतली जाते (नेट) म्हणून तांत्रिक द्यानाचा अभाव व त्यामूळे भीती मनात निर्माण होते. म्हणून हे अपयशाचे कारण बनू शकते. त्यासाठी तांत्रिक द्यानाशी आद्ययावत रहा. त्यासाठी प्रक्टिस अधिक करा.
६) अभ्यासक्रम सतत जवळ ठेवा, अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करा.
शेवटी एक बाब महत्वाची, ती म्हणजे इच्छाशक्ती.
(सदर लेखाचे लेखक प्रा. समाधान लोटन कुंभार, सहाय्यक प्राध्यापक ,समाजशास्त्र विभाग मू. जे. महाविद्यालय ,जळगाव हे असून ते सेट (शिक्षणशास्त्र) सेट (समाजशास्त्र ) या विषयात पात्र आहेत)
@All Right Reserved , Posted by SKEducatoR
No comments:
Post a Comment