संशोधन
अभियोग्यता (Research Aptitude) या विषयाची तयारी कशी कराल
सेट नेट
पेपर पहिला (NET-SET Paper-I )
सेट
वा नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर करिता एकुण दहा घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यापैकी
एक महत्त्वाचा घटक म्हणजे संशोधन अभियोग्यता (Research
Aptitude) होय. मित्रांनो,
मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, मी केवळ एक वा दोन गुण कमी पडल्यामूळे पास झालेलो
नाही, हे तुमच्या सोबत होऊ नये असे मला वाटते.
म्हणूनच सदर ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रत्येक घटकाविषयी सविस्तर मार्गदर्शन मोफत स्वरूपात
विद्यार्थ्यांना मिळेल हा प्रयत्न सातत्याने करित आहे. सेट वा नेट परीक्षा पात्र होण्यासाठी
सदर लेखाच्या माध्यमातून संशोधन अभियोग्यता या विषयाची तयारी तुम्ही कशी कराल
? या विषयी माझी मते तुम्हाला सांगणार आहे. माझा या क्षेत्रातील एक तपापेक्षा जास्त अनुभव आहे.
मला असे जाणवले आहे की, अनेकदा विदयार्थी संशोधन या विषयावरील प्रश्नांची उत्तर अदाजे
देतात. अनेकदा प्रश्न सोपा असतो पण अदाजे उत्तरे देण्याच्या प्रयत्नात आपण फसतो. तेव्हा
खालील काही गोष्टी लक्षात असूदया व त्यानुसार तयारी करावी असे माझे प्रामाणिक मत आहे.
कशी कराल
संशोधन विषयाची तयारी हे लक्षात घ्या…
1) संशोधन
विषयातील मुलभूत संकल्पना समजून घ्या.
तुम्ही सेट वा नेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही संशोधन विषयातील मुलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहेत. हया संकल्पना मध्ये प्रामुख्याने संशोधन म्हणजे काय? संशोधन समस्या , संशोधन उद्दिष्टे, परिकल्पना, गृहीतके, जनसंख्या, नमुना अथवा न्यादर्श, संशोधन अभिकल्प , संख्याशास्त्रीय परिमाणे इत्यादी वा अनेक संकल्पनाचा समावेश होतो हया सर्व संकल्पना तुम्ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
2) प्रश्नपत्रिकेतील विचारलेले प्रश्न लक्षात घेणे :
संशोधन
विषयाची तयारी करताना परीक्षेत पुर्वी संशोधन विषयावर कशाप्रकारे प्रश्न विचारले गेले
आहेत ? हे पहावे ते प्रश्न संशोधन विषयातील कोणत्या संकल्पनेवर आधारित आहेत हे लक्षात
घ्यावे, ती संकल्पना बाजूला काढून त्यावर नोटस काढाव्यात व शिक्षक किंवा तुमच्या मित्राशी
चर्चा करून ती संकल्पना नेमकी काय आहे ? हे ध्यानात घ्यायला हवे. याला मी ‘प्रश्नाकडून
संकल्पनेकडे’ येणे असे संबोधतो.
3) एक पेज
नोटस काढा :
संशोधनातील
एका संकल्पनेवर केवळ एक पेज नोटस काढाव्यात. एकादा ती संकल्पना समजली की एक पेज नोटस
पुरेश्या आहेत, असे माझे ठाम मत आहे. समजा तुम्हाला ‘परिकल्पना’ या संशोधनाच्या
संकल्पनेवर नोटस काढावयाच्या आहेत तेव्हा त्यामध्ये परिकल्पनेचा अर्थ प्रकार व उदाहरण
ऐवढे पुरेशे आहे. या साठी तुम्ही प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात
येईल की परिकल्पनेवर त्याचा अर्थ प्रकार व उदाहरण यावरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.
4) संशोधन
विषयासाठी कोणती पुस्तके वाचाल :
अनेक विदयार्थी
प्रश्न विचारतात की, पेपर एक करिता कोणते पुस्तक वाचावे ? परंतु मी विद्यार्थ्यांना
सर्व पेपर एक करिता एक पुस्तक न वाचता घटक निहाय वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा सल्ला
नेहमीच देतो. शैक्षणिक संशोधन या विषयाकरता पुढील पुस्तके वाचावित अशी शिफारस मी करित
आहे.
ü
मुळे
रा. श आणि उमाठे वि. तु., शैक्षणिक संशोधनाची
मुलतत्त्वे, महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळ, नागपूर
ü
पंडित
ब. बि. , शिक्षणातील संशोधन,नित्यनूतन प्रकाशन, पुणे
ü
भिंताडे,
वि.रा. , शैक्षणिक संशोधन पद्धती, नूतन प्रकाशन,
पुणे.
ü
प्रदिप
आगलावे, संशोधन पध्दती आणि तंत्रे, विदयाप्रकाशन नागपूर
ü
दांडेकर
वा. ना. शैक्षणिक मूल्यामापन व संख्याशास्त्र, विदयाप्रकाशन नागपूर
ü
य.च.म.मु.
विदयापीठ, नाशिक ,संशोधन मार्गदर्शक मालिका
पुष्प 1 ते 15 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ ,नाशिक
ü
Best
John W & Kahn J. V. , Research In Education, New Delhi, Prentice Hall of
India Pvt. Ltd.
म्हणजे
मी तुम्हाला एम. एड. स्तरावरील शैक्षणिक संशोधन या विषयावरील संशोधनाच्या पुस्तकाची
शिफारस करित आहे. ही पुस्तके तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रकाशकाकडे व पुस्तकाच्या दुकानात
मिळतील अथवा जर कोणी एम. एड .करित असेल तर त्याच्या कडे पण असतील. जर तुम्हाला वरील
पुस्तके मिळाली नाहीत तरही काही हरकत नाही तुमच्या कडे संशोधनाचे जे पुस्तक असेल वा
जे पुस्तक तुम्ही मिळवू शकाल त्या पुस्तकातून तुम्ही संकल्पना समजून घ्याव्यात महत्त्वाचे
काय ? तर संकल्पना समजून घेणे.
5) पुस्तकाशिवाय
हा विषय हा विषय कसा समजून घ्याल ?
जर तुमच्या
कडे पुस्तके नसतील तर तुम्ही ती मिळविण्याचा प्रयत्न करा व जर मिळालीच नाही तर तुम्ही
संशोधन हा विषय कसा समजून घ्याल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर अगदी सोपे आहे.
ü गुगल वर
शैक्षणिक संशोधन विषयावर लाखोपेजस माहिती आहे त्यावर शोध घ्या.
ü युटयूब
वर संशोधन विषयावर व्हिडीओ पहा व संकल्पना समजून घ्या.
ü संशोधन
पध्दती या विषयावरील कार्यशाळा वा परिषदामध्ये सहभागी व्हा व संकल्पना समजून घ्या.
ü तुमच्या
एम.एड. वा पीएच. डी. झालेल्या मित्रांकडून संशोधन विषयातील संकल्पना माहिती करून घ्या.
ü संशोधन
पध्दती विषयावरील लेखांचे इंटरनेटवर वाचन करा.
मित्रांनो
‘इच्छा तिथे मार्ग’ हे आपणास माहित आहेच. महत्वाचे काय तर संशोधन विषयावरील संकल्पना
समजून घेणे. त्या कशा समजून घेणार आहात ते तुम्ही ठरवा. सदर ब्लॉगवर पण तुम्हाला सर्व
घटकाच्या महत्त्वपूर्ण नोटस मिळणार आहेतच. चला तर परीक्षेची तयारी करूया !
©
सर्व हक्क सुरक्षित by SKEucator
No comments:
Post a Comment