Sunday, 27 June 2021

संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)

 

संशोधन अभियोग्यता (Research Aptitude) या विषयाची तयारी कशी कराल
सेट नेट पेपर पहिला (NET-SET Paper-I )

                             

सेट वा नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर करिता एकुण दहा घटकावर प्रश्न विचारले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे संशोधन अभियोग्यता (Research Aptitude)  होय. मित्रांनो, मला अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, मी केवळ एक वा दोन गुण कमी पडल्यामूळे पास झालेलो  नाही, हे तुमच्या सोबत होऊ नये असे मला वाटते. म्हणूनच सदर ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रत्येक घटकाविषयी सविस्तर मार्गदर्शन मोफत स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळेल हा प्रयत्न सातत्याने करित आहे. सेट वा नेट परीक्षा पात्र होण्यासाठी सदर लेखाच्या माध्यमातून संशोधन अभियोग्यता या विषयाची तयारी तुम्ही कशी कराल ? या विषयी माझी मते तुम्हाला सांगणार आहे. माझा या क्षेत्रातील एक तपापेक्षा जास्त अनुभव आहे. मला असे जाणवले आहे की, अनेकदा विदयार्थी संशोधन या विषयावरील प्रश्नांची उत्तर अदाजे देतात. अनेकदा प्रश्न सोपा असतो पण अदाजे उत्तरे देण्याच्या प्रयत्नात आपण फसतो. तेव्हा खालील काही गोष्टी लक्षात असूदया व त्यानुसार तयारी करावी असे माझे प्रामाणिक मत आहे.

कशी कराल संशोधन विषयाची तयारी हे लक्षात घ्या…

1)      संशोधन विषयातील मुलभूत संकल्पना समजून घ्या.

तुम्ही सेट वा नेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही संशोधन विषयातील मुलभूत संकल्पना  समजून घेणे आवश्यक आहेत. हया संकल्पना मध्ये प्रामुख्याने संशोधन म्हणजे काय? संशोधन समस्या , संशोधन उद्दिष्टे, परिकल्पना, गृहीतके, जनसंख्या, नमुना अथवा न्यादर्श, संशोधन अभिकल्प , संख्याशास्त्रीय परिमाणे इत्यादी वा अनेक संकल्पनाचा समावेश होतो हया सर्व संकल्पना तुम्ही समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

2) प्रश्नपत्रिकेतील विचारलेले प्रश्न लक्षात घेणे :

संशोधन विषयाची तयारी करताना परीक्षेत पुर्वी संशोधन विषयावर कशाप्रकारे प्रश्न विचारले गेले आहेत ? हे पहावे ते प्रश्न संशोधन विषयातील कोणत्या संकल्पनेवर आधारित आहेत हे लक्षात घ्यावे, ती संकल्पना बाजूला काढून त्यावर नोटस काढाव्यात व शिक्षक किंवा तुमच्या मित्राशी चर्चा करून ती संकल्पना नेमकी काय आहे ? हे ध्यानात घ्यायला हवे. याला मी ‘प्रश्नाकडून संकल्पनेकडे’ येणे असे संबोधतो.

3)      एक पेज नोटस काढा :

संशोधनातील एका संकल्पनेवर केवळ एक पेज नोटस काढाव्यात. एकादा ती संकल्पना समजली की एक पेज नोटस पुरेश्या आहेत, असे माझे ठाम मत आहे. समजा तुम्हाला ‘परिकल्पना’ या संशोधनाच्या संकल्पनेवर नोटस काढावयाच्या आहेत तेव्हा त्यामध्ये परिकल्पनेचा अर्थ प्रकार व उदाहरण ऐवढे पुरेशे आहे. या साठी तुम्ही प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की परिकल्पनेवर त्याचा अर्थ प्रकार व उदाहरण यावरच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

4)   संशोधन विषयासाठी कोणती पुस्तके वाचाल :

अनेक विदयार्थी प्रश्न विचारतात की, पेपर एक करिता कोणते पुस्तक वाचावे ? परंतु मी विद्यार्थ्यांना सर्व पेपर एक करिता एक पुस्तक न वाचता घटक निहाय वेगवेगळी पुस्तके वाचण्याचा सल्ला नेहमीच देतो. शैक्षणिक संशोधन या विषयाकरता पुढील पुस्तके वाचावित अशी शिफारस मी करित आहे.

ü मुळे रा. श आणि उमाठे वि. तु., शैक्षणिक  संशोधनाची मुलतत्त्वे, महाराष्ट्र ग्रंथ निर्मिती मंडळ, नागपूर

ü पंडित ब. बि. , शिक्षणातील संशोधन,नित्यनूतन प्रकाशन, पुणे

ü भिंताडे, वि.रा. , शैक्षणिक  संशोधन पद्धती, नूतन प्रकाशन, पुणे.

ü प्रदिप आगलावे, संशोधन पध्दती आणि तंत्रे, विदयाप्रकाशन नागपूर

ü दांडेकर वा. ना. शैक्षणिक मूल्यामापन व संख्याशास्त्र, विदयाप्रकाशन नागपूर

ü य.च.म.मु. विदयापीठ, नाशिक ,संशोधन मार्गदर्शक मालिका    पुष्प 1 ते 15 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठ ,नाशिक

ü Best John W & Kahn J. V. , Research In Education, New Delhi, Prentice Hall of India Pvt. Ltd.

म्हणजे मी तुम्हाला एम. एड. स्तरावरील शैक्षणिक संशोधन या विषयावरील संशोधनाच्या पुस्तकाची शिफारस करित आहे. ही पुस्तके तुम्हाला तुमच्या जवळच्या प्रकाशकाकडे व पुस्तकाच्या दुकानात मिळतील अथवा जर कोणी एम. एड .करित असेल तर त्याच्या कडे पण असतील. जर तुम्हाला वरील पुस्तके मिळाली नाहीत तरही काही हरकत नाही तुमच्या कडे संशोधनाचे जे पुस्तक असेल वा जे पुस्तक तुम्ही मिळवू शकाल त्या पुस्तकातून तुम्ही संकल्पना समजून घ्याव्यात महत्त्वाचे काय ? तर संकल्पना समजून घेणे.

5)   पुस्तकाशिवाय हा विषय हा विषय कसा समजून घ्याल ?

जर तुमच्या कडे पुस्तके नसतील तर तुम्ही ती मिळविण्याचा प्रयत्न करा व जर मिळालीच नाही तर तुम्ही संशोधन हा विषय कसा समजून घ्याल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर अगदी सोपे आहे.

 ü गुगल वर शैक्षणिक संशोधन विषयावर लाखोपेजस माहिती आहे त्यावर शोध घ्या.

 ü युटयूब वर संशोधन विषयावर व्हिडीओ पहा व संकल्पना समजून घ्या.

 ü संशोधन पध्दती या विषयावरील कार्यशाळा वा परिषदामध्ये सहभागी व्हा व संकल्पना समजून घ्या.

 ü तुमच्या एम.एड. वा पीएच. डी. झालेल्या मित्रांकडून संशोधन विषयातील संकल्पना माहिती करून घ्या.

 ü संशोधन पध्दती विषयावरील लेखांचे इंटरनेटवर वाचन करा.

मित्रांनो ‘इच्छा तिथे मार्ग’ हे आपणास माहित आहेच. महत्वाचे काय तर संशोधन विषयावरील संकल्पना समजून घेणे. त्या कशा समजून घेणार आहात ते तुम्ही ठरवा. सदर ब्लॉगवर पण तुम्हाला सर्व घटकाच्या महत्त्वपूर्ण नोटस मिळणार आहेतच. चला तर परीक्षेची तयारी  करूया !

  © सर्व हक्क सुरक्षित by SKEucator 


Saturday, 26 June 2021

संप्रेषण प्रश्नसंच

 


संप्रेषण  या घटकावर नेट सेट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरासह

                                                                                                    Photo by Aaron Burden on Unsplash

1)    संप्रेषणचक्रांचे प्रेषक, संदेश, ग्राहक व --------------हे घटक आहेत. (SET-जून 2020)

(A)            गोंधळ

(B)             माध्यम

(C)             अडथडे

(D)            प्रत्याभरण

2)    पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते ? (SET-जून 2020)

                    (A)            व्यक्तिगत संप्रेषण

(B)             औपचारिक संप्रेषण

(C)             क्षैतिज (Horizontal) संप्रेषण

(D)            अनौपचारिक संप्रेषण

3)    संप्रेषणाची व्याख्याकरताना मिलर --------------भर देतात. (SET-जून 2020)

(A)            ग्राहकाच्या वर्तनबदलावर

(B)             संदेशावर

(C)             अवबोधावर

(D)            प्रेषकावर

4)    संप्रेषणचक्रामध्ये प्रेषकांची क्रमित कार्य पुढीलप्रमाणे असतात : (SET-जून 2020)

(A)            संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण- प्रक्षेपण

(B)             ग्रहण -निसांकेतिकीकरण- अन्वय- प्रेक्षपण

(C)             ग्रहण-सुसूत्रीकरण – नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण

(D)            सांकेतिकीकरण-सुसूत्रीकरण– नि:सांकेतिकीकरण-प्रक्षेपण

5)    बहुसंख्य श्रोते, बहुजिनसी श्रोते (heterogeneous audiences), विस्तारित श्रोते व ---------------ही समुह माध्यमाची वैशिष्टये होत. (SET-जून 2020)

(A)            निरीक्षर श्रोते

(B)             गोंधळाचा अडथळा

(C)             प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव

(D)            प्रभावी माध्यम

6)    डॉ. देवल, यांच्या मते संप्रेषण म्हणजे----- (SET-जून 2019)

(A)            कल्पनांचे सामायिकीकरण

(B)             अनुभवांचे सामायिकीकरण

(C)             अवबोधन

(D)            भावनाचे सामायिकीकरण

7)    वर्गात पाठ शिकविण्यासाठी माध्यमाची निवड करताना शिक्षकाने पाठाची उदिष्टे, विद्यार्थ्यांचा वयोगट, वापरल्या जाणाऱ्या  माध्यमाविषयीचे ज्ञान व ------------------लक्षात घेतले पाहिजे. (SET-जून 2019)

(A)            अध्यापन पध्दती

(B)             शैक्षणिक साधने

(C)             समूह माध्यम

(D)            मूल्यमापन व्यवस्था

8)    टॅफिक सिग्नलस हे संप्रेषणचे उदाहरण होय. (SET-जून 2019)

(A)            समूह

(B)             अशाब्दिक

(C)             शाब्दिक

(D)            एकाकडून अनेक

9)    एखादया मॉलमध्ये गिऱ्हाईके येतात ते आपल्या सामाईक हिताच्या बाबींची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करतात व त्या समूहाच्या कृती  स्थिरपणे वृध्दिगंत

होत जातात हे--------- समूहाचे उदाहरण होय.   (SET-जून 2019)

(A)            मुक्त

(B)             बध्द

(C)             सहकारी

(D)            श्रेणीबध्द

10)  काहीवेळा समूह माध्यमे समाजाला चुकीच्या मार्गाला लावतात कारण येथे-------- ग्राहक असतात. (SET-जून 2019)

(A)            बहुजिनसी (heterogenous)

(B)             असंख्य

(C)             निरीक्षर

(D)            चिकित्सक


उत्तरसूची :

(B)             माध्यम

(C)             क्षैतिज (Horizontal) संप्रेषण

(A)            ग्राहकाच्या वर्तनबदलावर

(A)            संग्रहण- सुसूत्रीकरण -सांकेतिकीकरण- प्रक्षेपण

(B)             प्रत्यक्ष प्रत्याभरणाचा अभाव

(C)             अवबोधन

(D)            मूल्यमापन व्यवस्था

(B)             अशाब्दिक

(A)            मुक्त

(A)            बहुजिनसी (heterogenous)

 

 


Friday, 25 June 2021

Unit 4. Communication

 

                               घटक क्र. 5 संप्रेषण (Communication )

                                                Photo by Jason Rosewell on Unsplash

घटक क्र. 5 संप्रेषण

ü Communication: Meaning, types and characteristics of communication.  संप्रेषण : अर्थ ,प्रकार आणि संप्रेषणाची वैशिष्टे

ü Effective communication: Verbal and Non-verbal,Inter-Cultural and group communications प्रभावी संप्रेषण : शाब्दीक आणि अशाब्दीक, आंतर सांस्कृतिक आणि समूह संप्रेषण

ü Classroom communication वर्ग  संप्रेषण

ü Barriers to effective communication प्रभावी संप्रेषणातील अडथळे

ü Mass-Media and Society जनसंर्पक माध्यमे आणि समाज

संप्रेषणासंबंधी हया संकल्पना लक्षात ठेवा :

  • Communication (संप्रेषण / संज्ञापन )
  • Verbal Communication (शाब्दिक संप्रेषण)
  • Non-verbal Communication (अशाब्दिक संपेषण )
  • Interpersonal Communication 
  • Group Communication समूह संप्रेषण / गट संप्रेषण
  • Inter-Cultural Communication
  • Effective Communication (प्रभावी संप्रेषण)
  • Mass Communication (संप्रेषण / संज्ञापन )

संप्रेषणाचे स्वरूप (Nature of Communication)

o              संप्रेषण एक प्रक्रिया (Communication is a Process)

 एकमार्गी प्रक्रिया (One Way Process)

व्दिमार्गी प्रक्रिया (Two Way Process) 

संप्रेषण कला व शास्त्र (Art & Science)

 

संप्रेषणाचे घटक ( Elements of Communication)

§  प्रेषक (Sender)

§  ग्राहक (Receiver)

§  संदेश (Message)

§  प्रतिक (Symbol)

§  मार्ग (Channel) 

§  सांकेतिकीकरण(Endoding)

§  नि:सांकेतिकरण (Decoding)

§  प्रत्याभरण (Feedback)

§  गोंधळ (Noise)

§  संप्रेषण संदर्भ (Context)


उपयुक्त प्रश्नसंच

 

शिक्षक अभियोग्यता या घटकावर नेट सेट परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरासह       

                                                                                                       Photo by Nguyen Dang Hoang Nhu on Unsplash

1)    विमर्शी अध्यापन म्हणजे -------------------होय. (SET-जून 2020)

(A)            अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया

(B)             अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया

(C)             अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया

(D)            अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया

2)    शिक्षकांने ----------------------ओळखून अध्यापन केले पाहिजे(SET-जून 2020)

(A)            विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती

(B)             विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद

(C)             पालकांची आर्थिक स्थिती

(D)            पालकामधील व्यक्तिभेद

3)    अध्यापनाच्या पारंपरिक साहायभूत प्रणालीमध्ये चा समावेश होत (SET-जून 2020)

(A)            व्हाईट बोर्ड

(B)             स्मार्ट बोर्ड

(C)             डिजीटल बोर्ड

(D)            त्रिमितीय प्रतिकृती

4)    शिक्षक विद्यार्थ्यांच्या वहया तपासतात आणि शेरे देतात याला म्हणतात. (SET-जून 2020)

(A)            नोंदवही तपासणी

(B)             दैनंदिन शेरे

(C)             मूल्यमापन

(D)            मूल्यांकन

5)    सॉक्रेटीसने सत्यशोधनाची ---------------पध्दती दिली.

(A)            प्रायोगिक

(B)             निरीक्षण

(C)             चिकित्सा

(D)            संवाद

 

उत्तरसूची :

(C)             अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रिय प्रक्रिया

(B)             विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद

(D)            त्रिमितीय प्रतिकृती

(C)             मूल्यमापन

(D)            संवाद