Wednesday, 19 May 2021

सेटपरीक्षा आॅनलाईन अर्ज....

 


महाराष्ट्र राज्य सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यपात्रता परिक्षा महत्त्वाचे

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी सेट परिक्षा जाहिरात नुकतिच प्रकाशित झाली असुन आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या संकेतस्थळावर यासदर्भातील सविस्तर माहिती उपल्बध आहे. विदयापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तर माहिती पत्रक प्रसिध्द करण्यात आलेले आहे. विद्यापीठाद्वारे जारी केलेल्या परिपत्रकामध्ये अर्ज भरण्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

महत्त्वाचे दिनांक पुढील प्रमाणे….

आॅनलाईन अर्ज भरणे

दिनांक  17.05.2021

आॅनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक  10.06.2021

आॅनलाईन परिक्षा फी भरण्यासाठीचा अंतिम दिनांक

दिनांक 10.06.2021  वेळ सायकाळी 6 pm

हाॅलतिकिट उपलब्ध होण्याचा दिंनाक

दिनांक 10.09.2021

परिक्षेचा दिनांक (आॅफलाईन स्वरूप )

दिनांक 26.09.2021, रविवार

संकेतस्थळ

https://setexam.unipune.ac.in

परीक्षा एकूण किती विषयात घेतली जाणार

 एकूण 32 विषय

परीक्षा शुल्क (Fees)

 

खुला संवर्ग करिता रूपये 800/-

मागसवर्गाकरिता रूपये 650/-

एकुण पेपर व गुण

एकुण दोन पेपर (Total 2  papers)

पेपर पहिला : एकुण 50 प्रश्न 100 गुणाकरिता

पेपर दुसरा : एकुण 100 प्रश्न 200 गुणाकरिता



Monday, 17 May 2021

परीक्षा विषयक अनुभव...

 

अनुभवाचे बोल आणि मी सेट पात्र झालो....

                                             प्रा. समाधान लोटन कुंभार 

                                                             Photo by Adolfo Félix on Unsplash

अनेकांनी प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले असते. ज्यांच ध्येय हे १२ वी नंतर निश्चित झालेले असते, ते प्राध्यापक होण्यासाठीचे मार्ग शोधून ठेवतात व त्या अनुषंगाने मार्गक्रमण करीत असतात. बर्याचवेळा काही जणांच्या बाबतीत ऐनवेळेस प्राध्यापक होण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यासाठीच्या पात्रतांचा शोध घेता-घेता बराच वेळ त्यात खर्च होतो. त्यात भरीस-भर नेट/सेट परीक्षेविषयी अपूर्ण ग्यान व योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामूळे ही परीक्षा अधिकच कठीण आणि असाध्य वाटायला लागते. हळू-प्राध्यापक पेशातील रस व प्रेरणा कमी व्हायला लागते. परंतू जो ह्या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढतो व यश संपादन करतो तोच खरा शिक्षक, कारण अध्यापन कार्य हे देखील अवघड कडून सोप्याकडे या पध्दतीनेच करावे लागते.

माझ्या बाबतीतही काहीशा प्रमाणात वरील कथन केल्याप्रमाणेच झाले होते. मी बी.ए. पास झालो तोपर्यंत माझे ध्येय निश्चित नव्हते, आणि शिक्षकी/ प्राध्यापक व्यवसायाचा लवलेशही नव्हता. पदवीचे शिक्षण झाल्यानंतर काय करावे? हा प्रश्न उभा राहिला. त्याच काळात बी.एड. साठीची प्रवेश पात्रता चाचणीची जाहिरात वर्तमान पत्रात वाचली आणि फाॅर्म भरला व पासही झालो. चांगल्या बी.एड. काॅलेजला प्रवेशही झाला आणि त्यानंतर मात्र माझ्या मनात प्रकाश पडला तो शिक्षकी व्यवसायाचा. मी पूर्णपणे या क्षेत्रासाठी मनाची तयारी केली आणि प्रामाणिकपणे अभ्यासही केला. बी.एड. चांगल्या मार्कांनी पासही झालो. पुढील शिक्षणासाठी म्हणजेच एम.एड साठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील, शिक्षणशास्त्र विभागात प्रवेश घेतला. आतापर्यंत नेट/सेट परीक्षेविषयी फक्त वरवर ऐकले होते. मात्र एम.एड. चे शिक्षण घेत असतांना आम्हाला तेथील प्रा. इंदुमती भारंबेडाॅ. मनिषा इंदाणी व डाॅ. संतोष खिराडे यांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. त्याच वर्षात या परीक्षेचे स्वरुप कळाले. खरचं एखाद्या राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरची परीक्षा पास करायची असेल तर योग्य मार्गदर्शनाची व अचूक कृतीची जोड असावी लागते. आणि ते मला या ठिकाणी मिळाले होते. मी समाजशास्त्र विषयात तिसर्या प्रयत्नात तर शिक्षणशास्त्र विषयात चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालो.

मला या परीक्षे संदर्भात आलेला वैयक्तिक अनुभव

१) सदर परीक्षा ही प्राध्यापक होण्यासाठीची पात्रता चाचणी असल्यामूळे तिची काठीण्य पातळी त्याच बरोबरीची असते, आपण त्याचा म्हणजेच काठीण्य पातळीचा उगाच बाहू करतो आणि मनात भीतीचे वातावरण तयार करतो. असे करणे टाळावे.

३) सदर परीक्षेचा अभ्यास करतांना बाजारात आलेल्या संक्षिप्त पुस्तकांचा आपण अभ्यास करतो, परंतू असे न करता जास्तीत-जास्त संदर्भ पुस्तकांचे वाचन करावे तद्नंतर संक्षिप्त पुस्तकांचा अभ्यास करणे उचित.

३) दुसर्याने त्याच्या अभ्यासावरुन काढलेल्या नोट्सचा आपण अभ्यास करतो. त्याने त्याच्या आकलन क्षमतेनुसार व बुध्दिमत्तेनुसार त्या नोट्स काढलेल्या असतात त्या दुसर्यास किती उपयुक्त ठरतील ही शंका. म्हणून स्वतः नोट्स तयार करा.

४) अभ्यास करण्याचा आव नका आणू. अभ्यासाचे नियोजन करा. व अभ्यासाशी प्रामाणिक रहा.

५) सध्या परीक्षा आॅनलाईन  पध्दतीने घेतली जाते (नेट) म्हणून तांत्रिक द्यानाचा अभाव व त्यामूळे भीती मनात निर्माण होते.   म्हणून हे अपयशाचे कारण बनू शकते. त्यासाठी तांत्रिक द्यानाशी आद्ययावत रहा. त्यासाठी प्रक्टिस अधिक करा.

६) अभ्यासक्रम सतत जवळ ठेवा, अभ्यासक्रमानुसारच अभ्यास करा.

शेवटी एक बाब महत्वाची, ती म्हणजे इच्छाशक्ती.

(सदर लेखाचे लेखक प्रा. समाधान लोटन कुंभार, सहाय्यक प्राध्यापक ,समाजशास्त्र विभाग मू. जे. महाविद्यालय ,जळगाव हे असून ते सेट (शिक्षणशास्त्र) सेट (समाजशास्त्र ) या विषयात पात्र आहेत)

@All Right Reserved , Posted by SKEducatoR


Wednesday, 12 May 2021

अनुभवातून जाणून घ्या .....

 सेट आणि नेट परिक्षेबद्दलचा वैयक्तिक अनुभव

                                                                                  :- डॉ. मनिषा वसंतराव जगताप                                             


यूजीसी नेट आणि सेट मध्ये माझे यश सांगताना मला खूप अभिमान वाटतो. मी सेट (समाजशास्त्र आणि शिक्षणशास्त्र) आणि नेट (शिक्षणशास्त्र -प्रौढ व निरंतर शिक्षणपौढाध्यापनशास्त्रअनौपचारिक शिक्षण) याविषयात दुसऱ्या ते तिसऱ्या प्रयत्नात पास झाले. शिक्षकांनी दिलेली सर्व व्याख्यानेनोट्सचाचण्याटिप्स आणि युक्त्या परीक्षेच्या वेळी खूप फलदायी ठरल्या. माझे कुटुंबीय आणि शिक्षकांचे आभार मानू इच्छितो त्यांच्यामुळे माझे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी खूप प्रेरणा व पाठबळ लाभले आहे. सर्व नोट्स आणि मॉक टेस्टनोट्सव्हिडीओ लेक्चर्स खरोखरच उपयुक्त आहेत. मी फक्त माझ्या मार्गदर्शकांमुळे यशस्वी झाली आहे. सर्वसाधारणपणेएखाद्याला असे वाटते की यूजीसी नेट/सेट पास अशक्य आहे परंतु असे नाही.प्रयत्नात सातत्य ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.पहिल्या प्रयत्नात अपयश आले तर निराश न होता मेहनतीने पुन्हा अभ्यास करत रहावे.अभ्यासाचे विविध तंत्रे आणि काही कौशल्ये आत्मसात करणे हि काळाची गरजच आहे.

मी परीक्षा असो किंवा नसो अभ्यासासाठी माझी खालीलप्रमाणे अभ्यास करण्याची एक शैली आहे.यामुळे मला सर्वे कामे सांभाळून अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी वेळोवेळी फायदाच झाला आहे.

  • विषयानुसार अभ्यास मार्गदर्शिका तयार करा
  • प्रश्न आणि समस्या तयार करा आणि पूर्ण उत्तरे लिहा.
  • आपली स्वतःची क्विझ तयार करा.
  • शिक्षक व्हा. आपण स्वतः शिक्षक आहात आणि एखाद्या वर्गाला संकल्पना शिकवत आहात असे आपल्या स्वत: च्या शब्दात मोठ्याने माहिती सांगा.
  • आपल्या स्वत: च्या अनुभवांशी संबंधित उदाहरणे शोधा.
  • सामग्रीचे स्पष्टीकरण देणारी संकल्पना नकाशे किंवा आकृती तयार करा.
  • संकल्पनांचे प्रतिनिधित्व करणारे चिन्हे विकसित करा.
  • आपली अभ्यासाची जागा शांतआरामदायक आणि विचलित रहित असावी. हे आपण आनंदी आणि प्रेरणा वाटत पाहिजे. आपल्या पसंतीच्या चित्रे किंवा वस्तूंनी ते सजवा.
  • आपला सर्वोत्तम वेळ शोधा - काही लोक सकाळी चांगले काम करतात. इतर रात्री चांगले काम करतात. आपल्यासाठी कोणत्या वेळेस अनुकूल आहे ते कार्य करा आणि त्यानंतर अभ्यास करा.
  • आपल्या नेहमीच्या झोपायच्या वेळेपेक्षा जास्त अभ्यास करू नका.
  • अभ्यासासाठी माहितीचे स्रोत.
  • लेखन शैली.
  • प्रभावी वाचन.
  • नोट-टेकिंग.

नेहमी लक्षात ठेवा किआपल्या स्वतःवरचा विश्वास,आपली प्रबळ इच्छाशक्ती,मानसिक संतुलनजिद्द,चिकाटी,अभ्यासाची निष्ठाविविध अभ्यास स्रोत शोधण्याची धडपडतंत्रज्ञान माहिती तसेच सामाजमाध्यामांचा अभ्यासाच्या दृष्टीने उपयोगवेळेचे नियोजन यावर लक्ष केंद्रित केले तर यश हमखास आहे.

सेट/नेट परीक्षेसाठी आपणा सर्वाना हार्दीक शुभेच्छा !

  (सदर लेखाच्या लेखिका डॉ. मनिषा वसंतराव जगताप हया कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजळगाव च्या बहिस्थ शिक्षण आणि अध्ययन विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत.)  

@All Right Reserved, Posted by SKEducatoR