Pages

Very Important

पात्रता परीक्षा विषयी

ओळख सी. टी. ई. टी. (CTET) ची

 

ओळख सी. टी. ई. टी. (CTET) ची केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा


        सी. टी. ई. टी. अर्थात केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test) ही राष्ट्रीय स्तरावरील शिक्षक होण्यासाठीची परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्रिय माध्यमिक बोर्डाकडून वर्षातून दोन वेळा आयाजित केली जाते ही एक पात्रता परीक्षा आहे. पहिली ते आठवीच्या वर्गाचे शिक्षक होउ इच्छुकासाठी ही परीक्षा आहे. साधारत ही परीक्षा जुले व डिसेंबर या दोन महिन्यामध्ये घेतली जाते.

सीटीईटी म्हणजे काय ?

सी. टी. ई. टी. अर्थात केंद्रिय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teaacher Eligibility Test)

परीक्षेत एकूण किती पेपर असतात. ?

सीटीईटी या परीक्षेत एकूण दोन पेपर असतात. पेपर-1 आणि पेपर-2 जे छात्रशिक्षक पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी परीक्षा देतात त्याच्यासाठी पेपर-1 असतो तर जे छात्रशिक्षक सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक बनू इच्छितात त्यांना पेपर -2 दयावा लागतो.

पेपर एक व दोन करिता शैक्षणिक पात्रता वेगळी असते काय ?

होय , एक व दोन करिता शैक्षणिक पात्रता वेगळी असते.

पेपर 1 करिता शैक्षणिक पात्रता ?

बारावी (12 std) मध्ये कमीत कमी 50 %  गुण आणि दोन वर्षीय अध्यापन पदविका (D.
Ed. / D. T. Ed. / B.Ed. / D. L.Ed. etc,

पेपर 2 करिता शैक्षणिक पात्रता ?

पदवीधर आणि बी एड (B.Ed)

वयोमर्यादा

परीक्षेकरिता कमीतकमी वर 18 असून उच्चतम वर्यामर्यादेचे बंधन नाही तुम्ही किती ही वयापर्यंत परीक्षा देउ शकता.

परीक्षा किती वेळा देता येते ?

कितीही वेळा परीक्षा देतो येते जे विदयार्थी पास आहेत जे आपले गुण वाढविण्यासाठी परत परीक्षा देउ शकतात.

उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण किती आवश्यक असतात ?

खुल्यागटातील उमेदवाराकरिता = 60 %

एस सी एस टी ओबीसी उमेदवाराकरिता = 55 %

चुकीच्या उत्तरांना गुण वजावट लागू आहे का?

सदर परीक्षेत चुकीच्या उत्तरांना गुणवाजावट लागू नाही.


सीटीईटी परीक्षेचे स्वरूप ?

पेपर पहिला                                                                   वेळ 2. 30 तास

घटक

वस्तुनिष्ठ प्रश्न 

गुण

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

 30

30

भाषा-1

 30

30

भाषा-2

 30

30

गणित

 30

30

पर्यावरण

 30

30

एकूण

150

150


पेपर दुसरा                                                                   वेळ 2. 30 तास

घटक

वस्तुनिष्ठ प्रश्न 

गुण

बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र

 30

30

भाषा-1

 30

30

भाषा-2

 30

30

गणित व विज्ञान

(गणित व विज्ञान शिक्षकासाठी)

 60

60

  or

सामाजिकशास्त्रे

(सामाजिकशास्त्रे शिक्षकासाठी)

 60

60

एकूण

150

150

चला तर परीक्षेची मुलभूत माहिती मिळाली आहे. तेव्हा परीक्षेची सविस्तर तयारी करण्यास सुरवात करा. यश मिळेलच !

सदर लेखाचे लेखक हे श्री बी. एस. राठोड (D.Ed., M.Ed) हे असून ते टी. ई. टी. (TET) आणि सी. टी. ई. टी. (CTET) परीक्षा पात्र आहेत.


Published by SKEducatoR on Dated. 12.07.2021

No comments:

Post a Comment